Tuesday 24 December 2013

मन परिवर्तन
 डॉ.गजानन पाटील

            आज अध्यापक विध्यालायाच्या पडताळणी मोहिमे अंतर्गत सावर्डेला गेलो होतो. अध्यापक विध्यालायाच्या भेटी दरम्यान एका जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली. मुबई गोवा महामार्गवर  असलेली  ही केंद्रीय प्राथमिक शाळा  इतकी  दुर्लक्षीत  असेल  असे  वाटले  सुधा नाही.
    शक्यतो  माझ्या शाळा भेटीत वाड्या-वस्त्यातल्या शाळाना  जास्तच  वेळा  भेट  होते. तेवढ्या   मुख्य  रस्तयावरच्या  शाळाना भेटी होते नाहीत.  रस्तयालगत  गाडी  लावून  आमचे अधीक्षक श्री .डेकाटे सरानी  शाळेत कोण आहे का ते पाहिले तर  शाळेला सुट्टी  मुख्यध्यपिका  आणी एक शिक्षीका  वर्गात . 
     गाडीतून  मी शाळेच्या  प्रगणात पाऊल ठेवले आणी  शाळेची  दूरावस्था  पाहिल्यावर खूप व्यथित झालो. मोडलेला बुरूज त्याच्या फटीतुन  उगवलेले  गवत,मोडलेली पोषण  आहाराची  खोली, पटागन भर उगवलेले गवत, कचरा, उन्हाने    करपून  गेलेला. कधी  काली, हिरवी असलेली  रोपटी, डाव्या बाजूला  कुठल्यातरी  गावकरयाने   वाळू घातलेले कपडे, पटागनात  इतरत्र  पसरलेले दगड, रंग  उडलेले  बोर्ड, बाई व्हराडयातच उभ्या, पटागनात या म्हनालो तरी तेथेच उभ्या,सागळयाचे फोटो पटापट टिपले.  आम्ही  दोघेजण पायरी चढुन   आत गेलो. उजव्या बाजुला छोटयाशा खोलीत  मुख्यध्यपिकाची  केबिन. इथे  कोणी  कामच करत नव्हते. तेथे खूपच  घाण  होती. केंद्रीयप्रमुखाच्या खोलीत  घुशीने  फरशा  उखडलेल्या, कपाटात जुने साहित्य भरून  ठेवलेले.रंग  उडालेल्या  भिंती, टेबलाची, खुर्चाची  तशीच अवस्था, तुटलेल्या कौलांचा  कोपरयात ढिग, जुना मोडलेला टी.व्ही., व्हराड्यात दोन तीन कुंड्या त्यापैकी एकात झाड नाही. वर्ग खोल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या, शैक्षणिक साहित्य, अध्ययन कोपरयाचे झालेलं कोंडाळ, बंद पडलेल घड्याळ, कोपरयात कचरयाचे ढिग.  दुसरयाही खोलीची हीच अवस्ता.  छपर नसलेल्या खोलीत शालेय पोषण आहार शिजवला जातो.
       मी बाईना या सगळ्याचे  कारण विचारल तेव्हा जास्त अभिप्राय न देता. गावकराय्चे  सहकार्य नाही . माझ्या डोक्यात विचारांच काहूर माजल. राज्यात रत्नागिरी जिल्हा भौतिक सुविधांच्या बाबतीत अग्रेसर असताना रस्त्याकडची शाळा इतकी दुर्लक्षित कशी झाली असावी. गेली दोन वर्ष एकही वरिष्ठ अधिकारी या शाळेकडे फिरकला नाही.
       बाईना शाळेमध्ये येऊन १० वर्षे झाली. १० वर्षात जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात अनेक गोष्टी घडल्या. शाळा मात्र तेथेच राहिली. २२ मुलांच्या शाळेत सुट्टीनंतर एक छोटीशी मुलगी मस्टरवर मूल्य शिक्षणाचे धडे लिहीत होती आणि आम्ही मात्र मूल्य शाळेत शोधत होतो.
     आपण इतक्या दिवसात या शाळेला का भेटलो नाही याचा पश्याताप झाला. या जिल्ह्यात शेकडो शाळांना भेटी दिल्या त्या त्या शाळा सुधारल्या.  हि मात्र रस्त्याकडेची शाळा सुधारण्यापासून वंचित राहिली.  केंद्रप्रमुखाना फोन लावला ते नॉट रिचेबल , मनात असा प्रश्न उभा राहिला. यांच्यावर न केलेल्या बदल कार्यावाही करावी कि यांना संधी द्यावी मग  बसलो आणि एक पत्र तयार केले .

      प्रति,
          १.  केंद्र प्रमुख, ...........
         २.  मुख्याध्यापक,.........
  
         आज रोजी मी आपल्या शाळेला भेट दिली. खूप दैनीय आवस्था  आहे. सर्व शाळेचे फोटो टिपले. आपणास फोन लावण्याचा प्रयत्न केला पण लागला नाही. मुख्याध्यापिकेशी चर्चा केली. अनेक समस्या संगीतल्या. त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत.
   १.  या सर्व स्थितीचा वास्तव अहवाल  सादर करणे व पुढील प्रशासकीय कारवाई करणे.
   २.  आहे त्या परिस्थितीत तीस दिवसात शाळा सुधारण्याची संधी देणे.
       वरील पैकी दुसरा पर्याय मुख्याध्यापिका श्रीम. कलगुटकर व श्रीम. तेटाम्बे यांनी निवडला असून त्यांनी येत्या तीस  दिवसात शाळेचे बाह्य व अंतर्गत वातावरण सुंदर करावयाचे ठरविले आहे. त्यासाठी त्या तिघेजनानी पुढील गोष्टी करावयाच्या आहेत.
१.  सध्या शाळे बाबत भेडसावणाऱ्या   समस्यांचा आभ्यास करून त्या सत्वर सोडविण्यासाठी प्रयत्न        करून त्या सोडवणे.
  शाळेचा बाह्य परिसर सुशोभित करण्यासाठी काय करावे लागल त्याचे नियोजन करणे व त्या नुसार   खर्चाचे नियोजन करून प्रत्यक्ष कारवाई करणे.
३.  वर्गात असलेली सर्व घान, कचरा, निर्लेखित कारवयाच्या वस्तूंची पर्यावरनाला हानी न होता वील्हेवाट लावणे.
४. वर्ग अंतर्गत वातावरण आतिशय बोलके करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना आमलात आणणे.
५. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचे कार्यालय सुशोभित करणे.
६.  शाळेतील २२ मुलाना ओळख पत्र देणे. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी उपक्रम सुरु करणे.
७.  सर्व कपाटे नीटनेटकी करावीत. कागद पत्रे निट लावावीत.
८.  शालेय पोषण आहाराची व्यवस्था निट व दुसरी कडे करावी.
९.  स्वच्छता गृहे व्यवथित करावीत.
१०. सौरक्षण भिंतीसाठी समाज सहभागातून प्रयत्न करावा.
११.  शाळे समोरच्या जागेत बाग बगिच्या तयार करण्यासाठी तयारी करावी.
१२.  खेळण्यासाठी छोटेसे पटांगण तयार करावे.
१३.  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दुसरीकडे करावी.
१४.  भिंतीवर चांगले सुविचार लिहावेत.
१५.  व्हरांडा, वर्गखोल्या, बोलक्या कराव्यात.
१६.  सर्व फलक नव्याने तयार करून लिहावेत.
१७.  अध्ययन कोपरे निट नेटके करावेत.
१८.  शाळा समृद्ध करण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा.
       वरील सर्व बाबांची पुर्तता ३० दिवसात करावी. दि. १९/०१/२०१४ च्या भेटीत सर्व बाबी समाधानकारक वाटल्या तर आपल्या तिघांचा सत्कार केला जाईल. अन्यथा पुढील    प्रशासकिय कार्यवाहीसाठी शिफारशी केल्या जातील याची नोंद घ्यावी.                                                                डॉ.गजानन पाटील)
                                                         प्राचार्य
                                                    डायट, रत्नागिरी.

      पत्र  दिल्यावर पोच देण्या  पेक्षा पत्र देतानाच फोटो काढला. बाईना सांगितलं एक महिन्याने पुन्हा येतो. तो पर्यंत दिलेल्या सूचना प्रमाणे शाळा बदलून टाका. बाईने मान सुद्धा हालवली नाही. आपल्या शिक्षक बघिनिकडे बघून त्या डोळ्यानेच काही तरी बोलल्या. दरम्यान त्यांना मोबाईलवर राईट  टू पार्ट १ हि फिल्म दाखविली. मंग बाई पुन्हा विचारात पडल्या. 
        शाळेच्या पायऱया उतरताना माझ्या डोक्यात विचारांचं चक्र गरागर फिरू लागल. या शाळेच्या दुरवस्थेला कोण जबाबदार आहे. शिक्षक, समाज, शासन कि अधिकारी ५ वर्ष्याच्या कार्यकाळात ३५२ शाळांना भेटी झाल्या. उरलेल्या २५०० शाळांचे काय या साठी शिक्षण यंत्रणेत कोणता बदल करायला हवा. जस माझ घर तशी माझी शाळा वाटण्यासाठी अजून कोणती प्रेरणा घ्यायला हवी. जिल्ह्यातील सर्व शाळा वर्षभरात भेटी देऊन प्रेरित करण्यासाठी काय करायला हवेत अशा साऱ्या प्रश्नावर विचार मंथन करत परतिचा प्रवास सुरु झाला.
        आता वाट पाहूया येत्या ३० दिवसात मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि केंद्रप्रमुख हे तिघे मिळून काय करतात ते. त्यांच्या मनात ह्या साऱ्या गोष्टी भिडल्या असतील तर कदाचित करतील ते परिवर्तन आणि त्याना मी अभिमानाने म्हणेन हेच आहे मन परिवर्तन.......

                                                          डॉ.गजानन पाटील

No comments:

Post a Comment