Wednesday 1 January 2014

डॉ.गजानन पाटील
३१ डिसेम्बर २०१३
माझ्या प्रिय मित्रानो,
सप्रेम नमस्कार.

आज २०१३ वर्षाचा अखेरचा दिवस
उद्या २०१४ हे नवे वर्ष सुरु होणार
आज आपल्यातील काही मंडळी
३१ डिसेम्बर हा दिवस thirty first day म्हणून
साजरे करतील.
रात्रभर धिंगाणा करणे, नाचगाणी म्हणणे,
मास-मटण खाणे, मौज मजा करणे
आसे काही तरी करतात.
तर मित्रानो थोडा विचार करा,
का म्हणून वर्षाखेर साजरा करायचा?
का म्हणून thirty first day साजरा करून
पैसा उधळायचा ?
खरतर रोजचा दिवस नवा असतो.
तर म्हणाना हैप्पी न्यू डे.
रोजचा सूर्य नवा, शृष्टी नवी ,
मान नवा, उत्साह नवा, जोम नवा,
कल्पना नव्या,
मग फक्त १ जानेवारीलाच का साजरा करायचा?
त्या पेक्षा रोजचा नवा दिवस
रोजच साजरा करूया.
तरीही आजच्या दिवशी रात्री शांत बसा .
आणि आठवा वर्षभरातील आपल्या चुका.
आपल्या उणीवा, आपले अवगुण.
आणि त्यावर करा मनन, चिंतन
करा एक नवा संकल्प
उद्या पासून मी आस वागेल,
आस राहील, आसे काम करेन, आस विचार करेन.
आस करा एक शक्तिशाली विचार.
आणि करा प्रत्येकाला प्रेरित
देऊ नका कोणाला हैप्पी न्यू इयर चा संदेश
तर द्या हैप्पी न्यू डे चा संदेश
आणि द्या एक नवा संकल्प
मग आपोआप सारे जग बदलून जाईल
आणि रोजचा दिवस १ जानेवारी होईल हैप्पी न्यू डे माय फ्रेन्डस

डॉ.गजानन पाटील




No comments:

Post a Comment